येवल्याच्या आर्किटेक्ट भूषण लाड ठरला मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:48 PM2019-09-25T20:48:31+5:302019-09-25T20:48:45+5:30
येवला : येथील आर्किटेक्ट भूषण लाड यांना थायलंड मधील बँकॉंक येथे १६ सप्टेबर रोजी मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड या जागतिक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.
येवला : येथील आर्किटेक्ट भूषण लाड यांना थायलंड मधील बँकॉंक येथे १६ सप्टेबर रोजी मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड या जागतिक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांचे हस्ते भूषणला सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
वास्तुविशारद पदवीचे शिक्षण घेतलेल्या भूषण शामसुंदर लाड यांनी सुवर्ण रेषा हि संस्था सुरु केली. त्यांच्या कामाची दखल तसेच त्याचे लेख व गृहसजावटीचे छायाचित्राने द नासिक इन्फ्रास्ट्क्चर या मासिकात जागा मिळविली. निवासी, कार्यालयीन असे विविध आंतरिक सजावटीचे कार्य करणारा हा युवक २०१९ सालचा ‘मिलेनियम ब्रिलियन्स अवार्ड’चा मानकरी ठरला.
साशा मिडिया प्रा. लिमिटेड या कंपनीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा सन्मान वास्तुविशारद यांचे करिता दिला जातो. या स्पर्धेत जगातील नामवंत देशांचे वास्तुविशारद सहभागी झाले होते. भूषण लाड यांच्या वास्तुकलेला जगातील हा प्रसिद्ध मिलेनियम ब्रिलियन्स अवार्ड २०१९ करिता विजेता ठरला.