वक्तृत्व कला ही व्यक्तिमत्वाचे आभूषण -विश्राम निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:51 PM2019-12-20T17:51:47+5:302019-12-20T17:52:33+5:30
लोहोणेर : - शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला आत्मसात करावी असे आवाहन मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केले. ते जनता विद्यालय लोहोणेर शाळेत मविप्र केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
लोहोणेर : - शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला आत्मसात करावी असे आवाहन मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केले. ते जनता विद्यालय लोहोणेर शाळेत मविप्र केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलत होते. शालेय समितीचे अध्यक्ष अनिल आहेर,सोमनाथ जगताप, पर्यवक्षक कल्पना काळे, सुनील एखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र भदाणे यांनी केले. म् या स्पर्धेत एकूण देवळा, कळवण तालुक्यातील एकूण तेरा शाळांचे सुमारे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले होते. परीक्षक म्हणून सटाणा महाविद्यालयाचे प्रा.बी पी राठोड, प्रा.व्ही के पवार यांनी काम पाहिले. राकेश थोरात यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.