शहरात कलम १४४ 'जैसे थे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:14 PM2020-05-06T22:14:53+5:302020-05-06T23:57:55+5:30

नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे.

 Article 144 'As was' in the city | शहरात कलम १४४ 'जैसे थे'

शहरात कलम १४४ 'जैसे थे'

Next

नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आयुक्तालय हद्दीत सर्वच पोलिस ठाण्याकडून धडक कारवाई केली जाणार आहे.
मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी म्हटले आहे. भाजीपाला, दूधविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळमर्यादेचे पालन करावे. 'डिस्टन्स' ठेवण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. शहरात कोरोना विषाणूंचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून
लागू करून त्या तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली
आहे.
त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सरकारने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये, तसेच सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक असल्यामुळे नांगरे पाटील
यांनी कलम १४४चा कालावधी वाढविला आहे.

Web Title:  Article 144 'As was' in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक