नाशिक शहरात कलम १४४ ‘ जैसे-थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 02:24 PM2020-05-05T14:24:15+5:302020-05-05T14:28:52+5:30
सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, रेंगाळत उभे राहणे, चर्चा करणे, काही कार्यकमांचे आयोजन केल्यास या विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक असल्यामुळे नांगरे पाटील यांनी कलम 144चा कालावधी वाढविला आहे.
:
नाशिक : कोरोनाआजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरू आहे लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम 144 जैसे थे ठेवला असून यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्?याविरु द्ध मंगळवारपासून आयुक्तालय हद्दीत सर्वच पोलिस ठाण्याकडून धडक कारवाई केली जाणार आहे. कोरोना आजाराला रोखण्यासाठी लॉकडाउन सातत्याने सुरू आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या यंत्रणेवर मात्र दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १८ रु ग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळं नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी म्हटले आहे. भाजीपाला, दूध विक्र ीसाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळमार्यदेचे पालन करावे. डिस्टन्स ठेवण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करून त्या तरतुदीनुसार अधिसुचना निर्गिमत केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सरकारने कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संपर्कात लोकांनी येवु नये, तसेच सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, रेंगाळत उभे राहणे, चर्चा करणे, काही कार्यकमांचे आयोजन केल्यास या विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक असल्यामुळे नांगरे पाटील यांनी कलम 144चा कालावधी वाढविला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली आदी ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास तसेच वरील ठिकाणी सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणान्या मोटारसायकलसह सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करणारी अधिसूचना मार्चमध्येच काढण्यात आली आहे मात्र केंद्र सरकारने लॉक डाऊन वाढविल्याने या अधिसूचनेनुसार आदेशाला मुदतवाढ देवून येत्या 17 मार्चपर्यंत पर्यंत लागू करण्यात आला आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सुधारित अधिसूचनेत म्हटले आहे.
-------/
कायदा काय म्हणतो...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्र म,समारंभ,सांस्कृतिक कार्यक्र म, सण, उत्सव, ऊरस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्र म, किडा व इतर सर्व स्पर्धा इ. यांना मनाई राहील. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील.
--
मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, मैदाने, किडांगणे, जलतरण तलाव, उद्याने, जॉगिंग टॅक्स, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये इ. बंद राहतील. ड) सर्व नागरीकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी खालील नमूद कारणांशिवाय येण्यास मनाई राहील.
सदरचे आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत. शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्र म/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रु ग्णालये, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, सर्व प्रकारचे वैद्यकिय महाविद्यालय (अॅलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी), नर्सिंग कॉलेज, बॅक, विमा कार्यालये, पेट्रोलपंप.
‘डिस्टन्स’ महत्त्वाचाच...
सर्व प्रकारच्या अत्यावश्यक, आवश्यक व त्यासोबतच शासनाने निर्गिमत केलेल्या उपरोक्त संदर्भीय अधिसुचनेत नमुद केलेल्या व स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या आस्थापना सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम व अटीचे बंधनानुसार सकाळी १० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंतच सुरु राहतील. त्यापुर्वी व त्यानंतर सर्व आस्थापना पुर्णपणे बंद राहतील. हा नियम वैद्यकीय आस्थापना व सेवा यांना लागू होत नाही.
तसेच रस्त्यावर किरकोळ दुध विक्र ी करणारे व्यावसायीक यांना सकाळी६:०० ते ७:३० वाजेपर्यंत व सायंकाळी ४:०० ते ५:३० वाजेपर्यंत या वेळेत सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.