येवला तालुक्यात कृत्रिम खतटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:26 PM2020-07-17T21:26:36+5:302020-07-18T00:42:02+5:30
येवला : तालुक्यात प्रारंभीच्या दमदार पावसाने खरीप हंगामाच्या वेगाने पेरण्या पूर्ण झाल्या. खरीप पिके जोमात आहेत. कोळपणी व इतर शेतीकामे आटोपल्याने आता, पिकांना खतांची मात्रा देणे गरजेचे असताना तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात असून, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत.

सद्यस्थितीला तालुक्यातील खत विक्री दुकानांवर व विविध शेतकरी संघाकडे खत उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकत आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीच्या टप्प्यावर असताना नत्र खतांची गरज आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाची खतांसाठी शोधाशोध सुरू आहे.
येवला तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक खतसाठा दिल्या गेल्याचे सांगितले जात असताना खतटंचाई निर्माण झाली कशी, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या काही दिवसांत खतांचा काळाबाजार, जादा दराने खत विक्र ी, लिकिंग अशा तक्र ारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तक्रारींच्या वाढत्या संख्येने स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरावरून भरारी पथकेही तालुक्यात सक्रिय झाली. पण यानंतर तालुक्यात खत मिळेनाशी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मा योजनेत बांधावर बी-बियाणे व खते पुरविण्याची घोषणा कृषी विभागाकडून केली होती. तालुक्यात स्थानिक यंत्रणेने अनेक गावात बांधावर बी-बियाणे व खतेही वाटप केलेत; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना अपेक्षित खत आजही मिळत नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जाते.
शेतकरीवर्गाची खतांसाठी शोधाशोध.
तालुक्यात स्थानिक यंत्रणेने अनेक गावात बांधावर बी-बियाणे व खतेही वाटप.