बागलाण, नांदगाव तालुक्यात विक्रेत्यांकडून कृत्रिम खतटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:50 PM2020-07-10T20:50:56+5:302020-07-11T00:11:35+5:30
नामपूर : परिसरात व काटवन भागात युरिया खताची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना १ गोणी युरियासाठी दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नामपूर : परिसरात व काटवन भागात युरिया खताची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना १ गोणी युरियासाठी दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नामपूर परिसरात तसेच काटवण भागात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. काही भागातील शेतकºÞयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कोरोना संकटामुळे चार महिने रब्बी हंगाम टळल्याने शेतकºयाला संकटाचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे शेती माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आल्याने आर्थिक संकटाचा सामना सध्या शेतकरी करीत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगाम आल्याने पेरणीसाठी खते, बियाणे, औषधे, मशागत आदीसाठी मुबलक खर्च आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्ज, उसनवार पैसे घेऊन पेरणी झाली पण पिकांना युरिया खाद्य मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
नामपूर येथे शेती बी -बियाणे, खते आदींचे मार्केट असून काटवन परिसरातील बहुतांश शेतकरी नामपुर शहरावर अवलंबून आहेत. सध्या शेतकऱ्यांना
युरियाच्या १ किंवा २ गोणी मिळत असल्याने शेतकºयांनी कृषी विभागाविरुद्ध नाराजी व्यक्त
केली आहे. स्थानिक विक्रेते कमी पुरवठा होत असल्याचे सांगत आहेत. कृषी विभागाशी संपर्क साधला असता. युरिया तयार करणाºया कंपन्यांकडून कोरोना संकटामुळे खत पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कृषी खात्याने येत्या तीन ते चार दिवसात युरिया खताचा साठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
\--------------------
नांदगाव : सुरुवातीच्या दमदार पावसामुळे सध्या खरीप पिकांची स्थिती चांगली असून, ठिक-ठिकाणी कोळपणी झाल्याने पिकांना रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे असल्याच्या कालावधीतच तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई जाणवू लागल्याची तक्र ार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधिकाºयांकडे निवेदनद्वारे केली आहे. आत्मा योजनेत बांधावर बी-बियाणे व खते पुरविणारी शासकीय यंत्रणा तालुक्यात जोमाने कार्यरत असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खते मिळत नाहीत, याकडे स्वाभिमानी संघटनेने लक्ष वेधले आहे. लिंकिंग पद्धतीने रासायनिक खते वितरित करण्यात येत असल्याने मागेल त्याला खते मिळत नाहीत.
रासायनिक खतांचा काळा बाजार थांबवा. मुख्य विक्रे त्यांच्या गुदामांची तपासणी करा तसेच बनावट खते जप्त करून योग्य कारवाई करावी, त्याच प्रमाणे दोषी विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे अशी स्वाभिमानीची मागणी आहे. निवेदनावर नीलेश चव्हाण, परशराम शिंदे, निवृत्ती खालकर, ज्ञानेश्वर निकम, समाधान व्हडगर, हेमंत चोळके, गणेश चव्हाण, दत्तात्रय महाजन, दत्तात्रय सरोदे, तेजुल बोरसे यांच्या सह्या आहेत.
----------------
कोरोणाच्या संकटामुळे चार महिने खत खाद्य निर्माण करणाºया कंपन्या बंद असल्याने युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकºयांना मुबलक युरिया मिळावा यासाठी कृषी खात्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.
- रुपेश सावंत, सभापती,
वि. का. सोसायटी, नामपूर