ग्रामीण भागात गोधडी शिवण्याची कला आजही टिकून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:42 PM2019-07-08T17:42:01+5:302019-07-08T17:44:29+5:30
खमताणे : ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक हातांना काम नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पुरूषच नव्हे, तर महिलाही घराबाहेर पडताना दिसतात. बागलाण तालुक्यातील काही महिला आपल्या गोधडी बनविण्याच्या कलेला रोजगाराची संधी म्हणून शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन गोधडी शिवून देतात. शहरात मागणी असल्याने एका दिवसात सुमारे दोनशे रु पयापर्यंत रोजगार मिहलेला मिळत आहे.

बदलत्या काळात गोधडीला अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गोधडीचे आकर्षण आजही टिकून आहे. सध्या बाजारात विविध आकर्षक चादरी, दुलही, रंग, शाली उपलब्ध आहेत. मात्र पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेला गोधडीचा उबदारपणा आजही टिकून आहे.
अनेक परिवारातील घरामध्ये जुन्या नऊसाडी, सहावारी साड्या व इतर कपड्यापासुन गोधड्या तयार करतात. त्यामध्ये जुने कपडे वापरून विशिष्ट पद्धतीने आकर्षित रचना करून विविध रंगाचे कपडे जोडुन सुई -दोर्यांने नक्षीदार जोडणी करूण आकर्षक गोधडी तयार केली जाते.
नोकरदार महिलांसह आथिर्कदुष्ट्या समृद्ध कुटुंबे बाहेरील गोधडी शिवून देणार्या महिलांकडून विविध आकर्षक गोधड्या तयार करूण घेतात. एका गोधडीसाठी मजुरी दोनशे रु पयापर्यंत दिली जात असल्याने दिवसाला दोन गोधड्या शिवून कुटुंबाला आथिर्क हातभार लावला जात आहे. सुती कापडापासुन तयार केलेल्या गोधडीचा वापर अधिक केला जातो. c¸fIYeÔf
(फोटो ०८ खमताणे)