राखीव वनांमध्ये कृत्रिम पाणवठे भागवतायेत वन्यप्राण्यांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:54 PM2020-05-11T18:54:41+5:302020-05-11T18:58:51+5:30

येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्रासह भुलेगाव राखीव वनक्षेत्र मिळून सुमारे ३० पाणवठे या भागात आहेत

Artificial reservoirs quench the thirst of wildlife in reserved forests | राखीव वनांमध्ये कृत्रिम पाणवठे भागवतायेत वन्यप्राण्यांची तहान

राखीव वनांमध्ये कृत्रिम पाणवठे भागवतायेत वन्यप्राण्यांची तहान

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाकडून २५ ते ३० पाण्याचे टॅँकरद्वारे पाणी नैसर्गिक जलस्त्रोताचे खोदकाम करून ते विकसीत

नाशिक : चालू महिन्याचा एक आठवडा पूर्ण झाला असून आता शहरासह जिल्ह्यात ऊन चांगलेच तापत आहे. जिल्ह्यातील विविध राखीव संवर्धन वनक्षेत्रातील वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाकडून तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे मोठा आधार ठरत आहेत. वनविभागासहवन्यजीवप्रेमी पाणवठ्यांमध्ये सातत्याने पाणी भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नाशिकजवळील दिंडोरी तालुक्यातील बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात पाच पाणवठ्यांमध्ये नाशिक पुर्व वनविभागाकडून सातत्याने टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. येथे आढळलेल्या नैसर्गिक जलस्त्रोताचे खोदकाम करून तेदेखील विकसीत केले जात असल्याचे वनपाल वैभव गायकवाड यांनी सांगितले. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिक या स्वयंवेवी संस्था या वनक्षेत्रात वन्यप्राणी संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यापासून तर परिसरात संयुक्त गस्तीपर्यंत या संस्थेचे स्वयंसेवक वनविभागाला हातभार लावतात.

...अशी आहे राखीव वनांमधील वन्यजीव संपदा
बोरगडमध्ये विविध प्रजातीचे पक्षी, सर्प, रानससे, मोर, रानडुक्कर, कोल्हा, बिबट, लांडगा, तरस, मुंगुस, साळिंदर हे वन्यजीव आढळतात तसेच राजापुर-ममदापूरचे राखीव वन हे काळवीटांचे माहेरघर आहे. यासह लांडगे, मोर, रानडुकरे यांचाही वावर आढळतो.
 

 

Web Title: Artificial reservoirs quench the thirst of wildlife in reserved forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.