मालेगावी युरियाची कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:07 PM2020-07-20T21:07:00+5:302020-07-21T01:55:53+5:30
मालेगाव : तालुक्यात ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे आतापर्यंत ९३.२४ टक्के खरीप पेरणी झाली आहे सध्या खरिपाची पिके जोमात असतांना शेतकऱ्यांवर युरिया सारख्या रासायनिक खतांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कृषी सेवा केंद्रावर मुबलक युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर रांगा लावून युरिया खरेदीची वेळ आली आहे.

तालुक्यात सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाला शेतकºयांनी खरिपाच्या पिकांची पेरणी केली आहे तालुक्यात ३६ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर मका, १५ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर बाजरी तर पांढरे सोने समजले जाणाºया कपाशीची १९ हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. बाजरीची वाढ जोरात असून सध्या शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. मका पिकाची वाढ होत असताना युरिया सारख्या रासायनिक खताची गरज असते मात्र तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. शेतकºयांना वेळेवर युरिया उपलब्ध होत नसल्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहून युरिया विकत घ्यावा लागत आहे.
------------------
खतटंचाईमुळे शेतकरी हतबल
कृषी सेवा केंद्रावर इतर औषधे व रासायनिक खते घेत घेतली तरच युरिया दिला जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षी उत्पादित झालेल्या शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळाला शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असतांना युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून उखळ पांढरे करण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.