बागलाण तालुकावासीयांवर कृत्रिम पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:41 PM2020-07-06T23:41:08+5:302020-07-07T01:23:51+5:30
वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.
नितीन बोरसे ।
सटाणा : वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.
बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणी-देखील झाली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतशिवारात राहणाºया शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
गेल्या वर्षी बागलाणमधील शेतकºयांना दुष्काळाने आर्थिक अडचणीत आणले होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रब्बी हातात आला खरा; परंतु लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. या वारंवार येणाºया संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
डोक्यावर कर्जाचा बोजा असताना बहुतांश शेतकºयांनी खरिपासाठी खासगी कर्जे घेतली आणि खरिपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फुटत असताना वीज महावितरण कंपनीने ‘शॉक ’दिला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात तर आलाच; परंतु कृत्रिम पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
जळालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बदलून देणे बंधनकारक आहे; मात्र कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. बिले तर भरमसाठ दिले जातात. आगामी काळात कृषिपंप चोवीस तासात बदलून मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर आवाज उठविणार आहोत.
- दिलीप बोरसे, आमदार
लॉकडाऊनमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच रोहित्र दुरु स्तीअभावी पडून आहेत. काही दिवसांपूर्वी आॅइलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सात ते आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून देण्यात येतील.
- सुनील बोंडे,
कार्यकारी अभियंता, सटाणा विभाग