चिंचोलीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:00+5:302021-03-25T04:15:00+5:30
---------------------- पूर्व भागात कांद्याला फटका सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने ४०० हेक्टर कांदा पिकाला ...
----------------------
पूर्व भागात कांद्याला फटका
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने ४०० हेक्टर कांदा पिकाला फटका बसला आहे. काढणीला आलेल्या गव्हाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
------------------
फुले पतसंस्था सभासदांना लाभांश
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शोभा पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत यावर्षी सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचा ठराव करण्यात आला.
-------------------
नांदूरशिंगोटे - तळेगाव रस्त्याचे डांबरीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे ते तळेगाव या अठरा किलोमीटर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिक, वाहक चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
--------------------
कांदा दरात घसरण कायम
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच जिल्ह्यातील कांद्यास बाहेरील राज्यात मागणी नसल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
----------------
भाजी बाजरात रेखांकनाच्या सूचना
सिन्नर : शहरात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाबाबत आढावा घेऊन भाजी बाजारात रेखांकनाच्या सूचना नगरपरिषदेला देण्यात आल्या. भाजी बाजारात सामाजिक अतंर पाळत नसल्याचे निर्दशनास आल्याने त्यांनी आदेश दिले.