देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 06:52 PM2019-02-07T18:52:53+5:302019-02-07T18:53:23+5:30
देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
गावात १५८ नळधारकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल बाकी आहे. वारंवार नोटीस बजावून, प्रत्यक्ष भेटूनही पाणीपट्टी वसूल होत नसल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नळपाणी पुरवठा बंद केला आहे. परिणामी थकबाकी असलेल्या नळधारकांबरोबर नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरीकांची अडवणूक होत आहे. प्रशासनाने थकाबाकीदाराचे नळ कनेक्शन तोडावे व नियमित पाणीपट्टी भरणाºयांना पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
‘पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अनेकदा तोंडी, लेखी व प्रत्यक्ष भेटून नळधारकांना समज दिली. मात्र थकबाकीचे प्रमाण वाढतच गेले. वीजबील व कर्मचाºयांचे पगार थकल्याने हा कटू निर्णय घ्यावा लागला.
विमल शिंदे,
सरपंच, देशमाने.