प्रभाग ३१ मधील सदिच्छानगरात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:02 AM2018-08-07T01:02:14+5:302018-08-07T01:02:30+5:30
प्रभाग ३१ मधील सदिच्छानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन सभापती व विभागीय अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले.
इंदिरानगर : प्रभाग ३१ मधील सदिच्छानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन सभापती व विभागीय अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले. सदिच्छानगर परिसरात शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून, परिसरात सायंकाळी अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होतो त्यामुळे जेमतेम पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही तर वापराचे पाणी आणायचे कुठून असा प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन सभापती व विभागीय अधिकाºयांना दिले यावेळी जयश्री गावंडे, योगिता गावंडे, छाया काकड, सुगंधा भोये, रेणुका गाडेकर, सविता क्षीरसागर, उषा गुंजाळ, रुपाली मोरे, प्रतिभा पाटील, मनीषा वाघ आदी महिला उपस्थित होत्या.