कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार : मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:42 AM2019-01-08T00:42:13+5:302019-01-08T00:42:37+5:30
कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष द. वा. मुळे यांनी केले.
नाशिकरोड : कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष द. वा. मुळे यांनी केले.
नाशिक जिल्हा शैक्षणिक कलासंघ यांच्या वतीने के. एन. केला हायस्कूलमध्ये कलाशिक्षक व्यक्तिमत्व कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी मुळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ पोवळे, युवराज दत्त, हेमंत देवनपल्ली, कार्याध्यक्ष सुनील गवळी, मिलिंद टिळे, अजय पावटेकर, नरेंद्र खैरनार, चित्रकार मुरलीधर रोकडे ्रआदी उपस्थित होते.
डोम्स इंडस्ट्रीजचे रघुनाथ पवळे, युवराज दत्त यांनी विविध रंग साहित्याची, माध्यमांची माहिती दिली. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळालेले कलाशिक्षक अशोक धिवरे, संगीता टाकळकर, कुणाल गोराणकर, उदय देवनपल्ली, पी. टी. जाधव व सेवानिवृत्तीनिमित्त संजय मराठे, वाय. के. पवार, अरूण खैरनार, किशोर जाधव आदींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अशोक शिसोदे, अंबादास नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला.