वेदनेतूनच कलाकाराचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:47 AM2018-12-08T01:47:42+5:302018-12-08T01:48:11+5:30
रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाचा डंख सहन करून रंगभूमीवर कलाविष्कार सादर करणाऱ्या वसंत शिंदेंचे उदाहरण देताना खºया रंगकर्मींचा जन्म वेदनेतूनच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिक : रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाचा डंख सहन करून रंगभूमीवर कलाविष्कार सादर करणाऱ्या वसंत शिंदेंचे उदाहरण देताना खºया रंगकर्मींचा जन्म वेदनेतूनच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे (दि. ०७) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (दि. ७) मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना दिल्या जाणाºया पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘रंगभूमी दिन २०१८’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, केंद्रीय डोमेन एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, रंगकर्मी सचिन शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी नांदी सादर झाल्यानंतर लेखक प्रशांत दळवी यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्या वतीने दिलीप जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार व आमदार हेमंत टकले यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमतचे सुनील भास्कर यांना सांस्कृतिक पत्रकारिता पुरस्कार
मराठी रंगभूमी पुरस्कारांमध्ये लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक सुनील भास्कर यांना सांस्कृतिक पत्रकारितेसाठी जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या उद्योन्मुख कलाकारांचा परिचय रसिकांना करून देत नवकलाकारांना नाट्यक्षेत्रातील मार्गदर्शनपर पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी विजय साळवे यांना दत्ता भट अभिनय (पुरुष), नंदा रायते यांना शांता जोग अभिनय (स्त्री), सुनील देशपांडे यांना प्रभाकर पाटणकर दिग्दर्शन, मुरलीधर तांबट यांना गिरीधर मोरे प्रकाश योजना, आनंद बापट यांना रावसाहेब अंधारे नेपथ्य, सुगंधा शुक्ल यांना वा. श्री. पुरोहित बालरंगभूमी, प्रकाश नन्नावरे यांना रामदास बरकले लोककलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुटुंबीयांचा सन्मान
मराठी रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिवंगत रंगकर्मींच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले. यात दिवंगत सूर्यकांत देशपांडे, रघुनाथ साळवे, रमेश रोकडे, हरून बागवान, पद्माकर बेळगावकर, सुनील रत्नपारखी, विकास जाधव, मंगेश लोखंडे यांच्या कटुंबीयांना मानपत्र व स्मृतिदीप देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष योगदान पुरस्कार
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिख शाकेतर्फे आरोग्य सेवेत विशेष योगदान देणाºया डॉक्टरांनाही सन्मानित करण्यात आले. यात डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह डॉ. राजेश अहेर, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजीव पाठक यांना स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.