अभिनयातून घडतो कलाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:38 AM2019-03-15T01:38:36+5:302019-03-15T01:39:03+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सोनाली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सोनाली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, कलाकार हा मातीच्या ओल्या गोळ्याप्रमाणे असतो. त्याला दिग्दर्शक कुंभाराप्रमाणे आकार देत असतो. त्यातूनच अभिनय क्षेत्रातील कलाकार घडत जातो़
कुसुमाग्रज स्मारकात रंगलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर लोकेश शेवडे यांनी सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे देताना कुलकर्णी यांनी त्यांचा क लाक्षेत्रातील नाटक, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन असा बहुआयामी प्रवास नाशिककर रसिंकासमोर उलगडला. त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील ‘व्हाइट लीली’ या नाटकापासून ते रमाबाई आंबेडकर, मिशन काश्मीर, डॉ. प्रकाश बाबा आमटे, दोघी, कच्चा लिंबू, गुलाबजामस आदी विविध चित्रपटांमधील भूमिका साकारताना आलेला अनुभव व विविध किस्से प्रेक्षकांसमोर माडले. तसेच आपल्या अभिनय प्रवासातही विविध दिग्दर्शकांनी उल्लेखनीय मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कलाकारांनी चित्रपट अथवा नाटकाची निवड करताना संहिता वाचून किंवा ऐकून भूमिका करण्याचा निर्णय घेतेलेला असतो. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतर दिग्दर्शक भूमिकेजी गरज ओळखून ज्या गोष्टी सांगतो त्या कलाकारांनी स्वीकारण्यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘मिशन क ाश्मीर’ चित्रपटाच्या राष्ट्रपती भवनातील सादरीकरणावेळी तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘रमाबाई आंबेडकर’ चित्रपटातील रमा भूमिकेला मिळालेली दाद आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विनायक रानडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सोनाली कुलकर्णी ‘खुदाबख्श’ व्यक्तिमत्व
लेखिका, कवयित्री, अभिनेत्री असलेल्या सोनाली कुलकर्णी सिनेमा, थेटरही करतात. त्यांच्या अंगी बहुकलागुण असतानाही त्यांनी आपल्या आवडीचा छंद व्यवसाय म्हणून निवडला. आवडीचा छंद व्यवसाय म्हणून निवडण्याची संधी मिळाल्याने त्या विशेष भाग्यवंत असून, त्यांच्यावर ईश्वराची खास कृपादृष्टी आहे. बहुकलांनी संपन्न असलेल्या या अभिनेत्री ‘खुदाबख्श’ व्यक्तिमत्व असल्याचे प्र्रतिपादन माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले.