कलासंवर्धन करणारी संस्कारभारती टिळक भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:17 AM2017-09-23T00:17:53+5:302017-09-23T00:18:00+5:30
हित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे. कलाकार आणि कलासाधक यांचे संघटन व्हावे म्हणून संस्कारभाती संस्था कार्यरत आहे.
परिचय महिला संस्थांचा
हित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे. कलाकार आणि कलासाधक यांचे संघटन व्हावे म्हणून संस्कारभाती संस्था कार्यरत आहे. भारतीय संस्कृती व कलेचे संवर्धन व्हावे, कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, कलाकारांना मार्गदर्शन व्हावे व लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी ही संस्था निरनिराळे उपक्रम राबवित असते. त्यात नववर्ष गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, भरतमुनी जयंती, भारतमाता पूजन असे निरनिराळे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. गुढीपाडव्याला रांगोळ्यांची सजावट करून मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाते. सकाळी पारंपरिक वेशात शोभायात्रा काढली जाते. त्यात आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. गुरुपौर्णिमेला गुरु-शिष्य परंपरा आणि गुरुंविषयी पुज्य भाव प्रकट करणारे गायन, वादन, नृत्य आदि विविध कार्यक्रम सादर केले जातात. शिष्य-गुरुंना कार्यक्रमाद्वारे वंदन करतात. गुरुंचा सन्मान केला जातो. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुंच्या घरी जाऊन रांगोळी काढून आदर व्यक्त केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णावर आधारित एखादा कार्यक्रम घेतला जातो. दिवाळीसारख्या सणाला सदस्य व हितचिंतकांचे स्नेहसंमेलन भरविले जाते. यावेळी वेगवेगळे कलाविष्कार सादर केले जातात. तर नाट्यशास्त्राचे प्रणेते भरतमुनी यांचे स्मरण करुन कलाविष्कार सादर केला जातो. संगीत नाटकातील प्रवेश, त्यावर आधारित गाणी आणि नांदी असा सुरेख कार्यक्रम असतो. प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतमातेचे पूजन केले जाते. याशिवाय संस्कारभारतीकडून अखिलभारतीय नृत्यधारा, रांगोळी शिबिरे, मंगळागौरीचे खेळ, चित्रकला वर्ग, मासिक संगीत सभा यांसह इतरही अनेक कार्यक्रम सादर केले जातात. या संस्कारभारती संस्थेत प्राची कलकर्णी, रागिणी किणीकर, मेघना बेडेकर, देवयानी लेले, नूपुर सावजी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सक्रिय सहभाग देत आहेत.