महागाईचा भडका! गड्या आपली सायकल बरी; पेट्रोलसाठी मोजावे लागताहेत ११३ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 03:43 PM2022-03-26T15:43:46+5:302022-03-26T15:50:14+5:30

नाशिक - देशात निवडणुका लागताच पेट्रोल , डिझेल , गॅसची दरवाढ थांबते किंवा दर कमी होतात. मात्र, निवडणुकांचा कालावधी संपताच ...

As fuel prices rise, groceries, pulses, milk, fruits and vegetables prices also increase | महागाईचा भडका! गड्या आपली सायकल बरी; पेट्रोलसाठी मोजावे लागताहेत ११३ रुपये

महागाईचा भडका! गड्या आपली सायकल बरी; पेट्रोलसाठी मोजावे लागताहेत ११३ रुपये

Next

नाशिक - देशात निवडणुका लागताच पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ थांबते किंवा दर कमी होतात. मात्र, निवडणुकांचा कालावधी संपताच पुन्हा इंधन दरवाढीचा भडका होतो. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने गत चार महिन्यांपासून इंधनदर वाढ स्थिर होती. विशेष म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेले असतानादेखील देशात इंधन दरवाढ झाली नाही. दोन आठवड्यांपूर्वी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने इतर वस्तूदेखील महाग होत आहे. परिणामी, दररोज महागाईत होरपळत असलेल्या सामान्य नागरिकांना ‘गड्या आपली सायकल बरी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सारचे महागणार

पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढल्याने भाजीपाला, किराणा, औद्योगिक उत्पादनांच्या वाहतूक खर्चात वाढ होते. त्यामुळे सर्वच वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ होते. हा वाढीव खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे इंधन दरवाढीची झळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या ग्राहकांना सोसावी लागते.

पुन्हा दरवाढ सुरू

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मागील चार ते पाच महिने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती स्थिर असल्याचे दिसून आले. दोन आठवड्यांपूर्वी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधन दरवाढ सुरू झाली आहे.

अशी झाली दरवाढ

महिना -------------पेट्रोल ------ डिझेल

जानेवारी २०२० --८१.२९------७२.४२

जानेवारी २०२१ --१०९.९८ ---९४.१४

जानेवारी २०२२ --११०.४०----९३.१६

२५ मार्च २०२२ --- ११२.९५ ----९५.८४

सामान्य म्हणतात...

निवडणुका जवळ आल्या की, इंधन दर स्थिर आणि निवडणुका संपल्या की लगेच दरवाढीचा भडका, हा नेहमीचाच अनुभव झाला आहे. मागील दोन वर्षांपासून जनता महागाईत होरपळत असून त्यावर राज्यकर्ते काही बोलत नाहीत.

- संपत जाधव

इंधनाचे दर वाढले की किराणा, डाळी, दूध, फळे, भाजीपाला अशा सर्वच गोष्टी महागतात. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या महागाईमुळे घर चालवणे कठीण झाले आहे. आता पुन्हा इंधन दरवाढ सुरू झाल्याने महागाई कुठे जाईल याची धास्ती आहे.

- पूजा नाईक

Web Title: As fuel prices rise, groceries, pulses, milk, fruits and vegetables prices also increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.