लासलगावी कांदा लिलाव सुरू होताच कमी दरामुळे पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 11:59 AM2023-08-24T11:59:37+5:302023-08-24T12:00:35+5:30
लिलाव बंद पाडल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.
शेखर देसाई, लासलगाव (जि नाशिक)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांदा या शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू झाले परंतु कांद्याला बाजार भाव कमी जाहीर झाला अशी भूमिका घेत कांदा उत्पादक यांनी लिलाव बंद पाडले आहेत. लिलाव बंद पाडल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.
बाजार समितीत आज 550 ट्रॅक्टर मधून कांदा आवक झालेली होती. कांद्याचा लिलाव सुमारे 2200 ते 2500 रुपये कांदा भाव जाहीर झाला परंतु शिवसेनेचे माजी पंचायत समिती उपसभापती शिवा सूरासे यांच्या सहकारी शेतकरी वर्गाने कांदा भाव कमी जाहीर झाल्याच्या निषेधार्थ लिलाव बंद पाडले .दहा व वाजून पंधरा मिनिटांनी लिलाव बंद पडले असून अजून 175 वाहनातील कांद्याचा लिलाव होणे बाकी आहे .बंद लिलाव पूर्ववत सुरू होण्यासाठी लासलगाव बाजार समिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे, यांच्यासह कर्मचारी व्यापारी प्रयत्नशील आहेत.