भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:25 PM2023-09-05T23:25:32+5:302023-09-05T23:26:16+5:30

सध्या टॉमेटो हंगाम सुरू आहे सुरुवातीला तीन ते चार हजार असा बाजार भाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली.

As the prices fell, farmers threw tomatoes on the road | भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

googlenewsNext

गणेश शेवरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगांव बाजार समितीत टोमॅटोचे भाव कोसळले आणि त्यामुळे बाजार समितीमध्येच आपले टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आशिया खंडातील टोमॅटोची मोठी बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बाजार समितीचा लौकिक आहे. सध्या टॉमेटो हंगाम सुरू आहे. सुरुवातीला तीन ते चार हजार असा बाजार भाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली.

मंगळवारी २० किलोच्या कॅरेटला अवघा १०० ते १७० रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीमध्ये टोमॅटो घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारातच टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला.

Web Title: As the prices fell, farmers threw tomatoes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.