आसारामबापू आश्रमातील अतिक्रमण हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM2018-05-20T00:27:48+5:302018-05-20T00:27:48+5:30

महापालिकेने गोदावरी नदीतीरावरील पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याची तयारी चालविली असून, आनंदवली शिवारातील आसारामबापू आश्रमातील वाढीव बांधकामही पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. गोदावरी नदीकिनारी पूररेषेत काही व्यावसायिकांनी बांधकामे करत अतिक्रमण केले आहे.

 Asaram Bapu will remove the encroachment in the ashram | आसारामबापू आश्रमातील अतिक्रमण हटविणार

आसारामबापू आश्रमातील अतिक्रमण हटविणार

Next

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीतीरावरील पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याची तयारी चालविली असून, आनंदवली शिवारातील आसारामबापू आश्रमातील वाढीव बांधकामही पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.गोदावरी नदीकिनारी पूररेषेत काही व्यावसायिकांनी बांधकामे करत अतिक्रमण केले आहे. त्यात आसारामबापू आश्रमातील वाढीव बांधकामाचाही समावेश आहे. महापालिकेने यापूर्वी आश्रमातील वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली होती.  आता मंजूर बांधकामापेक्षा जास्त बांधकाम केलेले बांधकाम हटविण्यासाठी महापालिकेने आश्रमाला अंतिम नोटीस बजावल्यानंतर पश्चिम विभागाने कारवाईसाठी प्रकरण अतिक्रमण विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे पुढील सप्ताहात आश्रमातील वाढीव बांधकामांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे.  महापालिकेने आनंदवली शिवारातील ग्रीन फिल्ड लॉन्स, गंगाजल नर्सरीसह विश्वास लॉन्स यांनाही नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचेही पूररेषेतील बांधकाम हटविण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. पूररेषेतील बांधकाम हटविण्यात येणार असल्याने अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होणार आहे.

Web Title:  Asaram Bapu will remove the encroachment in the ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.