आशा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:04 AM2018-07-06T01:04:54+5:302018-07-06T01:05:37+5:30
मालेगाव : शहरातील १४० आशा कर्मचाºयांचे १२ महिन्यांचे रखडलेले वेतन अदा करावे या मागणीसाठी संतप्त आशा कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन दिवसात रखडलेले वेतन अदा केले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लसीकरण व इतर आरोग्यसेवा पुरविण्याचे काम शहरातील १४० आशावर्कर करीत असतात. त्यांना दोन हजार रुपये वेतन आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी महापौर रशीद शेख यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी आंदोलनकर्त्या महिलांनी महापौरांची भेट घेऊन काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनात चारूशिला शिंदे, शोभा सूर्यवंशी, माधुरी शिंदे, रूपाली देशमुख, सुरेखा परदेशी, सविता जाधव आदींसह आशावर्कर सहभागी झाल्या होत्या.महापौरांनी दोन दिवसात वेतन अदा करू, असे आश्वासन दिले होते; मात्र दोन दिवस उलटूनही रखडलेले वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या आशावर्करने मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आयुक्त धायगुडे यांनी उपायुक्त कापडणीस रजेवर आहेत ते आल्यानंतर धनादेशवर स्वाक्षरी करतील व वेतन अदा होईल, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.