आशा, गटप्रवर्तक संघटनेचे मनमाड पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:19 PM2021-05-29T19:19:38+5:302021-05-30T00:00:56+5:30
मनमाड : आशा व गटप्रवर्तक यांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी करणार्या व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिले.
मनमाड : आशा व गटप्रवर्तक यांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी करणार्या व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिले.
आरोग्य मंत्र्यांनी रॅपीड ॲटिजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण आशा व गट प्रवर्तक यांना देऊन एक जबाबदारी त्यांच्यावर टाकण्याची घोषणा केली होती. त्या संदर्भात ऑनलाईन वृत्तावर अश्लील भाषेत अज्ञात व्यक्तीने तीन टिप्पणी केल्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्य सरकारने अशा समाजकंटकास शोधून त्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदन पोलिस उपनिरीक्षक जांभळे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक विजय दराडे, पल्लवी साळुंखे, मोहिनी मैंद, वृशाली भोर, भारती बोडखे, सोनाली सोनवणे, मनिषा फड, मनिषा जाधव, सविता खैरनार, जयश्री डघळे, रेखा झाल्टे, उज्वला पगारे, फरिन शाह, सुनिता आहिरे, संगिता माकुणे, ज्योती आव्हाड, रत्ना केदारे, वैशाली जगताप, निर्मला एंळींजे, मिना थोडे आदी उपस्थित होते.