पिंपळगावच्या आशा सेविकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:31 PM2020-09-24T16:31:19+5:302020-09-24T16:31:50+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या ४० आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी गुरु वारी (दि. २४) पासून ते शनिवार (दि.२६) पर्यंत कामबंदची हाक देत विविध मागण्यांसाठी आमदार दिलीप बनकर यांच्यासह येथील प्राथमिक आरोग्य सहायक शरद तिडके यांना निवेदन सादर केले.

पिंपळगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासोबत आशासेविकांना शासन प्रशासने सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळत आहे. तसेच शासनाच्या आदेशान्वये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ मोहिमेअंतर्गत देखील सर्व्हे करण्याचे काम आशासेविकांवर सोपविण्यात आल्याने त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने किट नसल्याने कोरोना संक्रमित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वेळेवर मानधन मिळत नाही. तुटपुंज्या मानधनावर कसे काम करणार, शासन प्रशासन्सने आशा सेविकांच्या विचार करत मानधन किमान ५ हजार करावे, सर्व आशा सेविकांना पन्नास लाखांचे विमा कवच मिळावे, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्याची सुरिक्षत किट मिळावे, सेवा कालावधीत कायम करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनप्रसंगी आशा सेविका आदींसह आशा सेविका अपर्णा नेरकर, स्वाती देशमुख, संगीता शिरसाठ, सारिका बिडवे, अनिता भालेराव, कविता टोंगारे, संगीता जाधव, संगीता गांगुर्डे, सुनीता कोकाटे, संगीता शिंदे, स्वाती वाघ, रागिणी शिरसाठ, शालिनी भोई, अनिता आहेर, वंदना पुंड, सीमा निकम, सुनीता ईखे, वंदना लाड, आदी आशासेविका उपस्थित होत्या.