पिंपळगाव येथे आशासेविकांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:07 PM2020-07-03T22:07:07+5:302020-07-04T00:34:14+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला.
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला. आम्हाला सेवा कालावधीत कायम करावे व आमचे मानधन वाढवावे. आम्हाला बाधित परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी पीपीई किट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संगीता शिरसाठ, प्रीती नाईक, रागिनी शिरसाठ, संगीता गांगुर्डे, सारिका बिडवे, स्मिता निकम, कविता टोंगारे, सुनीता कोकाटे, संगीता शिंदे, रूपाली सूर्यवंशी, विनता अकोलकर, वंदना पुंड, शारदा राऊत, अर्चना खैरणार, वंदना लाड, सरला बोरस्ते, अनिता गायकवाड आदी उपस्थित होते.