आशा स्वयंसेविकांचे लोकप्रतिनिधींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:00+5:302021-06-21T04:11:00+5:30
कोरोनात काम करत असताना आशा सेविका बाधित होण्यासह मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यांची व गटप्रवर्तकांच्या कुटुंबाची हमी शासन घेत ...
कोरोनात काम करत असताना आशा सेविका बाधित होण्यासह मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यांची व गटप्रवर्तकांच्या कुटुंबाची हमी शासन घेत नाही. कोरोना कामाचा मोबदला फक्त ३३ रुपये रोज देत आहेत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक रविवारसहित दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भविष्यामध्ये ८ तास ड्यूटी करावी लागणार आहे, जे काम आशा करतात त्याचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांनाच करावे लागते. म्हणून त्यांना इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम केले पाहिजे, अशी मागणी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. यावेळी गटप्रवर्तक आशा शेळके, योगीता जाधव, ज्योती जाधव, आशा स्वयंसेविका हेमलता कासार, लता वाघ, अस्मिता थोरात, हेमलता बोरसे, मंगल बैरागी, प्रतिभा कानडे आदी उपस्थित होत्या.
फोटो - २० सिन्नर आशा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचे निवेदन आमदार माणिकराव कोकाटे यांना देताना गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका.
===Photopath===
200621\20nsk_13_20062021_13.jpg
===Caption===
फोटो - २० सिन्नर आशा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचे निवेदन आमदार माणिकराव कोकाटे यांना देतांना गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका.