दुगलगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी आशाबाई लासुरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 08:49 PM2019-09-04T20:49:14+5:302019-09-04T20:49:51+5:30

अंदरसुल : येवला तालुक्यातील दुगलगाव ग्रामपंचायतच्या दि. ३१ आॅगष्ट रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मंगळवारी (दि.३) झालेल्या मतमोजणीत थेट जनतेतून झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलच्या आशा रावसाहेब लासुरे यांनी विगय मिळविला.

Ashabai Lasure won the Durgalgaon Gram Panchayat as the Deputy General Sarpanch | दुगलगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी आशाबाई लासुरे विजयी

दुगलगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी आशाबाई लासुरे विजयी

Next
ठळक मुद्दे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

लोकमत न्यूजनेटवर्क
अंदरसुल : येवला तालुक्यातील दुगलगाव ग्रामपंचायतच्या दि. ३१ आॅगष्ट रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मंगळवारी (दि.३) झालेल्या मतमोजणीत थेट जनतेतून झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलच्या आशा रावसाहेब लासुरे यांनी विगय मिळविला.
लासुरे यांनी २६० मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार शोभा निवत्ती लासुरे यांचा ११४ मतांनी पराभव केला, तर सरपंच व सदस्य अशा दोन्ही पदावर निवडणूक लढविलेल्या आशा लासुरे यांनी या दोन्ही जागेवर विजय मिळविला. दरम्यान निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
सात सदस्य असलेल्या दुगलगाव ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण स्त्री राखीव असलेल्या सरपंचपद निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते, मात्र चुरशीची लढत दोन उमेदवारात झाली. सात सदस्य संख्या असलेल्या सदस्यपदासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग असलेल्या दोन जागेची बिनविरोध निवड झाली होती.उर्वरित पाच सदस्यपदासाठी एकास एक लढत होऊन अनुसूचित जाती प्रवर्ग विठ्ठल छबु माळी, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्ग प्रतिभा सखाहरी लासुरे, सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग माधुरी योगेश लासुरे, शोभा निवत्ती लासुरे, आशा रावसाहेब लासुरे, अनुसूचित जाती प्रवर्ग भालचंद्र भिकाजी त्रिभुवन, नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रकाश सोपान मोरे आदी सदस्यांनी विजय मिळविला. तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जितेंद्र शिवनये यांनी कामकाज पाहिले.
 

Web Title: Ashabai Lasure won the Durgalgaon Gram Panchayat as the Deputy General Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.