दोन दिवसांत ३१ हजार हेक्टर क्षेत्राची ‘राख-रांगोळी’ अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका, ५ तालुक्यांत २१ हजार शेतकरी देशोधडीला
By admin | Published: December 14, 2014 01:58 AM2014-12-14T01:58:16+5:302014-12-14T01:59:10+5:30
दोन दिवसांत ३१ हजार हेक्टर क्षेत्राची ‘राख-रांगोळी’ अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका, ५ तालुक्यांत २१ हजार शेतकरी देशोधडीला
नाशिक : जिल्'ात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३१ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळींब, कांदा, टमाटा, हरभरा, गहू आदि पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून, सुमारे २१ हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्'ातील तब्बल २० हजार ८९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरूच असून, शुक्रवारी दिवसभर जिल्'ात ठिकठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटीने पुन्हा रब्बीच्या पिकांना फटका बसला. तसेच फळबागा आणि द्राक्षबागाही उद््धवस्त झाल्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कृषी विभागाकडे पाच तालुक्यांतील प्राथमिक नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ४६ गावांमधील १० हजार ६० शेतकऱ्यांचे ५ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. तसेच कळवण तालुक्यातील ९ गावांमध्ये ३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. त्याचप्रमाणे देवळा तालुक्यातील १४ गावांमध्ये ३ हजार २६ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीला अवकाळी पावसाचा व फटका बसला आहे. तसेच बागलाण तालुक्यातील ४१ गावांमध्ये १ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील ४ हजार २५७ शेतकऱ्यांचे १ हजार १ ७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सुमारे २० हजार ८९५ हेक्टर क्षेत्रावरील तर शुक्रवारी १० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर मिळून एकूण सुमारे ३१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावरील प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, डाळींब, हरभरा, गहू, टमाटा आदि पिकांचे नुकसान झाले आहे.(प्रतिनिधी)