अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका मार्ग आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:06 AM2018-05-28T01:06:52+5:302018-05-28T01:06:52+5:30
स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिक शहराच्या स्मार्टरोड उपक्रमाला प्रारंभ झाल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक सोमवार, दि. २८ पासून बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहतुकीतील हा बदल तीन महिने असणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
नाशिक : स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिक शहराच्या स्मार्टरोड उपक्रमाला प्रारंभ झाल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक सोमवार, दि. २८ पासून बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहतुकीतील हा बदल तीन महिने असणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका हा पायलट प्रकल्प असून, रस्त्याच्या दोन्ही बाजंूचा कायापालट होणार आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतचा मार्ग (काम सुरू असलेली बाजू) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने येणाºया-जाणाºया वाहनांना एकाच लेनमध्ये मार्ग खुला असणार आहे. सदर मार्गावर एकाच लेनमधून सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाण्या-येण्यासाठी सुरू करण्यात असून, सदर मार्गावर थांबणे, पार्किंग, बस-रिक्षाथांबा असणार नाही. पादचाºयांना या काळात भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे. अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जिल्हाधिकारी कार्यालय, एसबीआय बँक (ट्रेझरी)कडे जाणाºया वाहनांना सदर मार्ग बंद असणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा ट्रेझरीत जाणाºयांना अशोकस्तंभाहून आर. के. सांगली बॅँक सिंग्नल, शालिमार, शिवाजीरोड, सीबीएसमार्गे कोर्टात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन घेऊन जाता येईल किंवा अशोकस्तंभाहून गंगापूरनाका, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएस मार्गाने कोर्टात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाता येईल. अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याकडे जाणाºया चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना प्रवेशबंद असणार आहे. मात्र दुचाकीसाठी मार्ग खुला असेल.