नामपूरच्या सरपंचपदी अशोक पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 06:33 PM2019-10-15T18:33:48+5:302019-10-15T18:34:12+5:30
सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली.
नामपूर : येथील सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली.
विकास पॅनलचे अशोक पवार व आपल पॅनलचे पुष्पा मुथा यांच्याकडून सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज करण्यात आला. नामपुर ग्रामपंचायतीत सदस्य संख्या १७ आहे. यात सदस्यात गुप्त मतदान घेण्यात आले. अशोक पवार यांना नऊ व पुष्पा मुथा यांना आठ मते मिळाली निवड समितीकडून अशोक पवार यांना विजयी घोषित करण्यात आले.
नामपूर ग्रामपंचायतीत सत्ता विकास पॅनलच्या हाती आल्याने आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा. यावेळी पॅनल प्रमुख
विलास सावंत, शरद सावंत,
प्रसाद अलई, नकूल सावंत,भारत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच पदासाठी निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून सी. पि. अहिरे, तलाठी काष्टे तात्या, ग्रामविकास अधिकारी के. बी.
इंगळे आदींनी निवड प्रक्रि या पार पाडली तसेच ग्रा. पं. सदस्य गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.