अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:01 AM2017-08-15T01:01:47+5:302017-08-15T01:01:52+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहर स्मार्ट करण्याच्या दिशेने एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.१४) कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील मुख्य रहदारीचा असलेला अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका हा १.१ किलोमीटरचा रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नेहरू उद्यान आणि महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरणसंबंधी निविदाप्रक्रियेलाही यावेळी मान्यता देण्यात आली.

 Ashok Stambh to Trimbaknaka Smart Road | अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड साकारणार

अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड साकारणार

Next

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहर स्मार्ट करण्याच्या दिशेने एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.१४) कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील मुख्य रहदारीचा असलेला अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका हा १.१ किलोमीटरचा रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नेहरू उद्यान आणि महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरणसंबंधी निविदाप्रक्रियेलाही यावेळी मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीअंतर्गत कंपनीची बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात झाली. यावेळी, शहरातील एक रस्ता मॉडेल म्हणून स्मार्ट करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी, अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका (मोडक पॉइंट) हा १.१ कि.मी.चा २४ मीटर रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्त्यावरील अशोकस्तंभ, मेहेर, सीबीएस आणि त्र्यंबकनाका या चार जंक्शनचे आधुनिकिकरण केले जाणार असून, रस्त्यालगत सायकल ट्रॅक, माहिती व तंत्रज्ञानाशी निगडीत किआॅक्स यंत्रणा, अत्याधुनिक इलेक्ट्रिक पोल आदी सुविधा साकारल्या जाणार आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प राबविला जाणार असून, त्यासंबंधी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना सीताराम कुंटे यांनी दिल्या. याशिवाय, नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणासाठी निविदाप्रक्रियेला मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या रेट्रोफिटिंगअंतर्गत सदर नूतनीकरणाचे काम होणार असून, उद्यानात मॉडर्न अ‍ॅमिनिटीज, स्मार्ट इलेक्ट्रिक पोल, बेंचेस, जाहिरातींसाठी व्हिडिओ वॉल आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. १.०२ कोटी रुपयांचा सदरचा प्रकल्प आहे. तसेच महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणासाठी ३.०२ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. कलादालनात आधुनिक पद्धतीचे डिस्प्ले बोर्ड, वातानुकूलित यंत्रणा, जाहिरातीसाठी व्हिडिओ वॉल आदी सुविधा असणार आहेत. स्मार्ट सिटी सोल्युशन स्पर्धा भारत सरकारने स्मार्ट सिटी सोल्युशन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत ‘निशा’ हा प्रकल्प सादर केला जाणार असून, त्यात टाटा कन्सल्टन्सीच्या संशोधकांनी तयार केलेल्या आरोग्यविषयक मातृत्व, रक्तकोष, वैद्यारोह आदी प्रकल्पांचा समावेश आहे. सदर प्रकल्पासाठी लागणाºया ९७ लाख रुपये खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली. सदर स्पर्धेत नाशिकने पारितोषिक पटकावले, तर ६० टक्के सहभाग केंद्र सरकारकडून तर ४० संबंधित उद्योगांचा असणार आहे. संचालकांचा निर्णय महासभेवरच अवलंबून कंपनीवर कॉँग्रेस व राष्टÑवादीचा प्रत्येकी एक नगरसेवक संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय अद्याप महासभेने घेतलेला नाही. कॉँग्रेसने शाहू खैरे, तर राष्टÑवादीने अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. परंतु, महासभेने त्यावर निर्णय न घेता एसपीव्हीवर आमदार, खासदारांपासून गटनेत्यांचाही समावेश करणारा ठराव करत तो शासनाकडे पाठविला आहे. परंतु, त्याबाबत शासन निर्णय घेईल आणि महासभा ज्या दोन नावांची शिफारस करेल त्याला कंपनीचे संचालक मंडळ मान्यता देईल, असे सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Ashok Stambh to Trimbaknaka Smart Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.