अंबोली धरणात बुडून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:05 PM2020-01-08T17:05:59+5:302020-01-08T17:09:18+5:30

आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली.

Ashram school student dies in Amboli dam | अंबोली धरणात बुडून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

अंबोली धरणात बुडून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली.

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे सुमारे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी जवळील अंबोली धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आपल्या शिक्षकांसमवेत बुधवारी (दि.८) सकाळच्या सुमारास गेले. यावेळी इयत्ता तीसरीच्या वर्गात शिकणारे दोघे मुले धरणाजवळ गेल्याने तोल जाऊन पाण्यात कोसळले. ही बाब लक्षात येताच आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रूग्णालयात हलविले असता रोशन उत्तम लाखन (८,रा. नांदगाव कोहळी) याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या अंबोली गावातील आश्रमशाळेत शिकणाया विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, यासाठी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची सह अंबोली धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित केली होती. अंबोली धरण परिसर निसर्गरम्य असून येथे जैवविविधताही चांगली आढळते. सर्व मुले मोठ्या आनंदाने बागडत वनभोजनाकरिता हसत-खेळत धरणाच्या परिसरात पोहचली. येथे वनभोजनाचा आस्वाद घेत असतानाच अचानकपणे रोशन आणि उत्तम विलास धोंगडे (८, रा.वरसविहिर) हे दोघे मित्र धरणाच्या जलसाठ्याजवळ गेली. यावेळी आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली. यावेळी दोघे मुले पाण्यात पडल्याचे लक्षात येताच काही कर्मचा-यांनी तत्काळ धरणात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटांतच कर्मचा-यांनी रोशन व उत्तम या दोघांना पाण्यातून बाहेर काढले; मात्र रोशनचा उपचारापुर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला तर उत्तमचे दैव बलवत्तर असल्याने तो वाचला. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयीन सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.
---

Web Title: Ashram school student dies in Amboli dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.