अंबोली धरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:44 AM2020-01-09T00:44:42+5:302020-01-09T00:45:39+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.
आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात शिकणारी दोन मुले धरणाजवळ गेल्याने तोल जाऊन पाण्यात पडले. घटनेचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांसमवेत सहलीला आलेल्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी धरणात उड्या घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविले असता यातील रोशन उत्तम लाखन (८, रा. नांदगाव कोहळी) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अंबोली गावातील आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, यासाठी शिक्षकांनी सहल अंबोली धरणाच्या परिसरात आयोजित केली होती. येथे वनभोजनाचा आस्वाद घेत असतानाच रोशन आणि उत्तम विलास धोंगडे (८, रा. वरसविहीर) हे दोघे धरणाजवळ गेले. तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले. मुलांच्या ओरडण््याचा आवाज आल्याने आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाजवळ धाव घेतली. यावेळी काही कर्मचाºयांनी धरणात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटांतच कर्मचाºयांनी रोशन व उत्तम या दोघांना पाण्यातून बाहेर काढले, मात्र रोशनचा मृत्यू झाला, तर उत्तमचे दैव बलवत्तर असल्याने तो वाचला. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.