इगतपुरी तालुक्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
By धनंजय रिसोडकर | Published: August 24, 2022 03:11 PM2022-08-24T15:11:36+5:302022-08-24T15:12:11+5:30
जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या धारा सुरू असतानाच विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देखील कसरत करावी लागली.
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आश्रम शाळेत काही विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये फूड पॉयझनिंग झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रारंभी ग्रामीण रुग्णालय व तिथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या धारा सुरू असतानाच विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देखील कसरत करावी लागली. ग्रामीण रुग्णालयात शाळे संबंधित विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते.
त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांच्यावर तिथेच उपचार करण्यात आले. मात्र दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयाकडे रेफर करण्यात आले आहे.