अश्वाने केला जेजुरी गड सर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:12 AM2018-03-16T00:12:29+5:302018-03-16T00:12:29+5:30
देशमाने : येथील जगताप कुटुंबीयांच्या योगीराज पवन या अश्वाने जेजुरी गड प्रथमच सर केल्याचा मान मिळविल्याने त्याचे कौतुक होत आहे.
देशमाने : येथील जगताप कुटुंबीयांच्या योगीराज पवन या अश्वाने जेजुरी गड प्रथमच सर केल्याचा मान मिळविल्याने त्याचे कौतुक होत आहे.
जगताप कुटुंबातील सर्वांनाच प्राण्यांविषयी आवड अन् जिव्हाळा. आजही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी गायी, बैल, सोबतच पिढीजात घोड्याचे संगोपन करण्याची भारी हौस. याच बरोबर कुस्तीतदेखील या कुटुंबीयांचे नाव राज्यभर गाजलेले. योगीराज पवन हे त्यांच्या घोड्याचे नाव. पंचक्रोशीत नावाजलेला आजवर अनेक स्पर्धा जिंकत त्याने गावाची ओळख चौफेर वाढविली. माजी सरपंच नाना जगताप अन् मोठे बंधू सुभाष जगताप यांचे घोड्यावर नितांत प्रेम . त्याने एकदा तरी जेजुरीचा गड सर करून खंडेरायाचे दर्शन घडवावे ही अनेक दिवसांची मनीषा त्याने अखेर नुकतीच सत्यात उतरवली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारागाड्या ओढणाऱ्या वरासोबत हा घोडादेखील जेजुरी येथे नेण्यात आला. नवीन गडाच्या पायथ्यापासून थेट खंडेराव मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत अखंडपणे घोड्याने गड सर केला.
घोडा पायºया चढून गडावर आल्याचे बघताच उपस्थित विश्वस्त, पुजारी, भाविकांनी आश्चर्य व्यक्त करून त्याचे पूजन केले. थेट गडावर घोडा येण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती विश्वस्त, पुजारी, अन् व्यावसायिकांनी दिली. दरम्यान, पवन योगीराजाच्या या कामगिरीमुळे जगताप कुटुंबीयांसह गावात आनंद साजरा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.