आश्विननगरचा जॉगिंग ट्रॅक हरवला धुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:11 AM2018-11-06T01:11:30+5:302018-11-06T01:11:45+5:30

आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

 Ashwin Nagar's jogging track lost dust | आश्विननगरचा जॉगिंग ट्रॅक हरवला धुळीत

आश्विननगरचा जॉगिंग ट्रॅक हरवला धुळीत

Next

सिडको : आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या धुळीचा त्रास होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर परिसरातील नागरिक जॉगिंगसाठी येतात. आरोग्य चांगले राहावे यासाठी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येथे येतात; परंतू देखभालअभावी ट्रकवर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॅकच्या लगत असलेल्या भागातही घाण व कचरा साचलेला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ट्रॅकवर म्युझिक सिस्टीम बसविण्यात आली असली तरी ती अनेकदा बंदच असते. ट्रॅकवरील धुळीमुळे येथे येणाºया नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. बंद अवस्थेत असतात, तर काही झाडाझुडपात अडकलेले आहेत. महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, सभापती हर्षा बडगुजर व नगरेसवक राकेश दोंदे, कावेरी घुगे यांनी अधिकाºयांसमवेत ट्रॅकची पाहणी केली. यावेळी जॉगिंग ट्रॅकवर नियमित पाणी मारण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्रकर्मचा-यांनी या आदेशालाही जुमानले नसल्याचे चित्र दिसत आहे.
राजे संभाजी क्रीडा संकुलाची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेला जॉगिंग ट्रॅकवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने यावरून चालताना धुळीचा त्रास होत आहे. महापालिका अधिकारी तसेच नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे स्टेडिअमचा विकास खुंटला असल्याचा आरोप माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी केला आहे.

Web Title:  Ashwin Nagar's jogging track lost dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.