अश्विनाथ महाराज यात्रोत्सव आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:52 PM2019-08-14T14:52:21+5:302019-08-14T17:42:49+5:30
नि-हाळे: नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील हिंंदू-मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अश्विनाथ बाबांचा यात्रोत्सव गुरूवार (दि. १५) रोजी सुरु होत आहे.
नि-हाळे: नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील हिंंदू-मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अश्विनाथ बाबांचा यात्रोत्सव गुरूवार (दि. १५) रोजी सुरु होत आहे. देवस्थान ट्र्स्टच्यावतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या गुरूवारी सिन्नर तालुक्यातल्या वावीजवळील हिरवळीने नटलेल्या अश्विनाथ (आशापीर) गडावरील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यावेळी होणाºया गर्दीमुळे डोंगरावरील जागा अपुरी पडते. भाविक व पर्यटकांच्या सततच्या वर्दळीमुळे देवस्थानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांसाठी आश्विनाथाच्या पूजेसाठी स्वतंत्र वेळ देण्यात येते. सकाळच्या सत्रात हिंदू बांधवांनी देवाची पूजा केल्यानंतर दुपारी ११ ते २ या वेळेत मुस्लिम बांधव पूजा करतात. त्यानंतर दोन्ही समाजाचे भक्तगण एकत्र दर्शन घेतात. मानाच्या काठ्या, संदल आणि रथांची मिरवणूक हे श्रावण महिन्यातील तिसºया गुरूवारी भरणाºया या यात्रेचे खास आकर्षण आहे. घोटेवाडीबरोबरच परिसरातील पारेगाव, पांगरी, निºहाळे, चिंचोली, माळवाडी येथील ताबूत, रथांची मिरवणूक काढली जाते. दरम्यान, घोटेवाडीत यात्रोत्सवाच्या निमित्ताने गुरूवारी सकाळी १० वाजता रथाची मिरवणूक, दुपारी ४ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून राज्यातील नामवंत मल्ल येथे हजेरी लावणार आहे. रात्री ८ वाजता शोभेची दारु उडविण्यात येणार आहे. गडावरील मुख्य देवस्थान अश्विनाथ महाराजांच्या समाधीला रंगरंगोटी करण्यासह परिसरात फरशी बसविण्यात आली आहे. यात्रोत्सवासाठी जाणाºया भाविकांना दर्शनाची व्यवस्था व्हावी, यासाठी सिन्नर आगाराने वावी ते अश्विनाथगड बससेवा ठेवली आहे. गुरूवारी सकाळी आठ वाजेपासून बससेवा सुरू होणार असून रात्री गर्दी ओसरेपर्यंत ती सुरू राहणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी दिली. नऊ बस या मार्गावर धावणार असल्याने भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून परिसर स्वच्छ करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रा समिती च्यावतीने नियोजन करण्यात येत आहे.