अश्विनी भिडे यांच्या गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:34 AM2018-11-18T00:34:10+5:302018-11-18T00:34:35+5:30

स्लाइड गिटार वादनातून दीपक क्षीरसागर यांच्या अनोख्या संगीत आविष्कारासोबतच जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. डॉ. कुर्तक ोटी सभागृहात शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे दोन दिवसीय कुर्तकोटी संगीत महोत्सवाला शनिवारी (दि.१७) सुरुवात झाली.

Ashwini Bhide singing of Nashikkar evening musical | अश्विनी भिडे यांच्या गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय

कुर्तकोटी संगीत महोत्सवात राग बिहारी सादर करताना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे. साथसंगत करताना हार्मोनियमवर ज्ञानेश्वर सोनवणे, तबल्यावर पुष्कराज जोशी, ताणपुऱ्यावर ऋतुजा लाड व हेमांगिनी कटारे.

googlenewsNext
ठळक मुद्देशंकराचार्य न्यास : कुर्तकोटी संगीत महोत्सवाला सुरुवात

नाशिक : स्लाइड गिटार वादनातून दीपक क्षीरसागर यांच्या अनोख्या संगीत आविष्कारासोबतच जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. डॉ. कुर्तक ोटी सभागृहात शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे दोन दिवसीय कुर्तकोटी संगीत महोत्सवाला शनिवारी (दि.१७) सुरुवात झाली. या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशीचे पाहिले सत्र जोधपूरचे ख्यातनाम स्लाइड गिटारवादक पंडित दीपक क्षीरसागर यांनी गुंफले.
भारतात स्लाइड गिटार या वाद्याला फार प्राचीन परंपरा नसली तरी बोटावर मोजण्या इतके कलाकार या अनोख्या वाद्यांतून भारतीय पारंपरिक संगीत वाजवतात. आशा अनोख्या वाद्याच्या वादनाचा अनोखा संगीत आविष्कार सादर करताना दीपक क्षीरसागर यांनी राग गावतीसह आलाप, जोड, झाला हे प्रकार प्रस्तुत केले. त्यांनी विलंबित गत आणि ध्रुत गत शैलीतील वादनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी अंतिम टप्प्यात देस रागातील रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर अहमदाबाद उस्ताद रेहमान खान यांचे शिष्य हेमंत जोशी यांनी संगीतसाथ केली. दुसरे सत्र जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गुंफले. त्यांनी आपल्या बहारदार शैलीत राग बिहारी सादर करताना ‘यहों निंद न आए, नैनन में वो निंद न आऐ’ बंदीश सादर केली. त्यांनी दृत तालातील बंदिशीसोबत सादर कलेला तराणा रसिकांची वाहवा मिळविरा ठरला. अंतिम टप्प्याच राग मालकंसमध्ये सादर केलेल्या बंदिशीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कबिरांचे दोहे सादर करून त्यांनी पहिल्या दिवसाच्या संगीत मैफिलीची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर ज्ञानेश्वर सोनवणे, तबल्यावर पुष्कराज जोशी तर ताणपुºयावर ऋतुजा लाड, हेमांगिनी कटारे यांनी साथ संगत केली. सूत्रसंचालन यास्मिन दांडेकर यांनी केले.

Web Title: Ashwini Bhide singing of Nashikkar evening musical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.