पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी अश्विनी खोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 05:22 PM2020-01-03T17:22:41+5:302020-01-03T17:23:01+5:30

रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवड

 Ashwini Khode as Vice Chancellor of Pimpalgaon Basavant | पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी अश्विनी खोडे

पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी अश्विनी खोडे

Next
ठळक मुद्देस्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : ग्रामपालिकेच्या मावळत्या उपसरपंच रु क्मिणी मोरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी अश्विनी रामकृष्ण खोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अलका बनकर व सदस्यांच्या उपस्थितीत स्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी सुरेश खोडे, विश्वास मोरे, संपत विधाते, चंद्रकांत खोडे, राजेंद्र खोडे, रामकृष्ण खोडे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, सुहास मोरे, गणेश बनकर, रु क्मिणी मोरे, बापू कडाळे, अल्पेश पारख, किरण लभडे, सुरेश गायकवाड, नंदू गांगुर्डे, शीतल बनकर, शीतल मोरे, मालती साळवे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते.
 

Web Title:  Ashwini Khode as Vice Chancellor of Pimpalgaon Basavant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.