वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी पवारने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:39 PM2020-01-29T22:39:55+5:302020-01-30T00:13:45+5:30
सिन्नर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाद्वारे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली.
सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाद्वारे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुल्लेकर, मविप्र समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे, परीक्षक डॉ. दत्तात्रेय गंधारे, डॉ. भास्कर ढोके, प्रा. विद्या कुलकर्णी, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, शकुंतला गायकवाड, डॉ. द. ल. फलके, डॉ. सुरेखा पाटील, जयश्री बागुल, प्रा. बी. यू. पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक आणि साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुल्लेकर यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. हेमंत वाजे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. द. ल. फलके यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैचारिक मंथन होऊन चांगला वक्ता निर्माण व्हावा या उद्देशाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन असल्याचे स्पष्ट केले. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. दत्तात्रय गंधारे, डॉ. भास्कर ढोके, प्रा. विद्या कुलकर्णी यांनी काम पाहिले. मामासाहेब दांडेकर यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, लोकशाहीतील मूल्य, बदलती शैक्षणिक धोरणे व विद्यार्थी, माध्यमांची नीतिशास्त्र, जागतिक आर्थिक मंदी व भारत आदी विषयांवर स्पर्धकांनी मते व्यक्त केली. या वक्तृत्व स्पर्धेत या विषयावर एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सूत्रसंचालन जयश्री बागुल यांनी केले, तर आभार प्रा. बी. यू. पवार यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील स्पर्धक व सिन्नर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : अश्विनी झुंबर पवार (पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह), द्वितीय क्रमांक - सुशील शशिकांत उशिरे (३ हजार रुपये व स्मृतिचिन्ह), तृतीय क्र मांक- मिथुन दत्तात्रेय माने ( दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह), उत्तेजनार्थ- महेश गणेश अहिरे (एक हजार रुपये). उत्स्फूर्त वक्ता : अमोल मिलिंद उगले (एक हजार रुपये) यांनी यश मिळविले. समारोप समारंभात यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले.