जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:05+5:302021-02-05T05:35:05+5:30

यासंदर्भात शुक्रवारी (दि२९) जीएसटी कार्यालयात सीजीएसटीचे आयुक्त अविनाश शेटे, एसजीएसटीचे सह आयुक्त अजय बोंडे, अतिरिक्त आयुक्त सुभाष टिळेकर ...

Ask the authorities to resolve the GST issues | जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना साकडे

जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना साकडे

Next

यासंदर्भात शुक्रवारी (दि२९) जीएसटी कार्यालयात सीजीएसटीचे आयुक्त अविनाश शेटे, एसजीएसटीचे सह आयुक्त अजय बोंडे, अतिरिक्त आयुक्त सुभाष टिळेकर यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, कर सल्लागार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिकचे अध्यक्ष सुनील देशमुख तसेच राजेंद्र बकरे, निवृत्ती मेारे, सनदी लेखापाल रवी राठी, सेामाणी,हेमंत डागा, प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे यांनी हे निवेदन दिले.

जीएसटी पोर्टल अपलोड करताना येणाऱ्या अडचणी यात मांडण्यात आल्या असून अनेकदा किरकोळ कारणासाठी नोटिसा देणे, तसेच अेाटीपी अवघ्या दहा मिनिटांसाठी असणे, अखेरच्या दिवसात पोर्टल हंँग होणे असे अनेक प्रकार होत असल्याने व्यापारी आणि कर सल्लागार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थंमंत्र्यांपर्यंत समस्या पोहोचवून त्यात सुधारणा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

छायाचित्र आर फोटोवर २९ टॅक्स नावाने सेव्ह.

Web Title: Ask the authorities to resolve the GST issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.