खासगी क्लासेसला परवानगीसाठी आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:03+5:302021-01-15T04:13:03+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शहर व जिल्ह्यातील क्लासेसला सुरू करण्यास अधिकृतरीत्या परवानगी मिळावी, या ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शहर व जिल्ह्यातील क्लासेसला सुरू करण्यास अधिकृतरीत्या परवानगी मिळावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि.१४) नाशिक महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकीकडे सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र शासकीय आदेशात शिकवणी वर्गांचा उल्लेख नाही. शहरातील काही क्लासेसही सुरू झाले आहेत. परंतु नियम व अटी देऊन सर्वच क्लासेस संचालकांना कमी विद्यार्थी संख्येने, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून अधिकृतरीत्या शासकीय आदेश काढून क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे कोचिंग क्लासेस संचालकांनी गुरुवारी (दि.१४) जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, सरचिटणीस लोकेश पारख, विवेक भोर, अशोक देशपांडे, रवींद्र पाटील, गणेश कोतकर, सुनीता बावणे, नीलेश दुसे, किशोर सपकाळे, सचिन अपसुंदे, पवन जोशी, पराग घारपुरे, किरण सूर्यवंशी, विष्णू चव्हाण, संतोष पवार, संतोष श्रीवास्तव, संतोष बागुल, किरण सानप, सागर परेवाल आदी उपस्थित होते.
(आरफोटो-१४कोचिंग क्लास) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देताना नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, मुकुंद रनाळकर, लोकेश पारख, विवेक भोर, अशोक देशपांडे, रवींद्र पाटील, गणेश कोतकर, सुनीता बावणे आदी.