लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला प्रश्न विचारा - कन्हैय्या कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:15 PM2018-08-20T21:15:13+5:302018-08-20T22:39:37+5:30
भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला
नाशिक : भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला आहे. तसेच नोटबंदीनंतर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न घटले. सरकारला जो कोणी प्रश्न विचारतो तो देशद्रोही ठरविला जातो, अशी टीकाही यावेळी कन्हैय्या कुमारने केली.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक विवेक व्याख्यानमालेत सोमवारी 56वे पुष्प कन्हैया कुमार गुंफत आहे. परशुराम सायखेडकर सभागृहात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सभागृहाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून सभागृहात येणार्या प्रत्येकाची झाडाझडती घेऊन प्रवेश दिला जात होता. भागृहात रेनकोट शाईचा पेन घेऊन येण्यासही मज्जाव करण्यात आला होता. तसेच धातूशोधक यंत्रांची तपासणी करुन प्रवेश दिला जात आहे. यापूर्वीही कुमार नाशिकमध्ये आले होते. तर, दाभोलकर व्याख्यानमालेनिमित्त नाशिकला भेट देण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.
पाहा व्हिडिओ -