तीन कोटी मागितले; अकरा लाखच आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 10:40 PM2020-10-21T22:40:04+5:302020-10-22T00:27:45+5:30
नाशिक : गेल्या जून महिन्यात जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु ...
नाशिक : गेल्या जून महिन्यात जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु पशुधन नुकसानीचे केवळ अकरा लाख रुपये इतकीच नुकसानभरपाई अद्याप प्राप्त झाली असून, शेतक?्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, याप्रकरणी पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याची शक्यता आगोदरच हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती. परंतु चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या जवळून गेल्याने जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसला नाही. पाऊस आणि वादळामुळे काही प्रमाणात पिकांचे तसेच घरांचे नुकसान नक्कीच झाले. या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाने भरपाईसाठी तीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र पशुधन नुकसानीचे केवळ ११ लाख रुपयेच प्राप्त झाले असून, अजूनही उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही. या विषयी विचारणा केली असता पंचनाम्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पंचनामे करावे लागले. त्यामुळे सर्व प्रस्ताव सोबत पाठविण्यात आल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून सहा महिने झाले आहेत. अजूनही घर पडझड व पीक नुकसानीची मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे. नूकसानभरपाईसाठी तीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यापैकी पशुधन नुकसानीचे ११ लाखांची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. मागील महिन्यातच शेतक?्यांना भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अजूनही याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. निसर्ग चक्रीवादळाचे ५३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. जोरदार पावसामुळे तर घरांची पडझड होऊन ४७५ कच्च्या घरांचे छत व पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी भिंती खचल्या होत्या. निसर्ग चक्रिवादळाने पशुधनाचेदेखील नुकसान झाले होते. ४५ मोठे, तर २८ छोटी जनावरे वीज पडून व अन्य कारणांनी दगावली होती.