कर्तृत्ववान महिलांना ‘अस्मिता’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:54 AM2019-11-25T00:54:24+5:302019-11-25T00:54:41+5:30

राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मिता प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 'Asmita' honors women in duty | कर्तृत्ववान महिलांना ‘अस्मिता’ सन्मान

कर्तृत्ववान महिलांना ‘अस्मिता’ सन्मान

googlenewsNext

नाशिक : राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मिता प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होत्या. व्यासपीठावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, अभिनेत्री गुरमितकौर चड्डा, अभिनेत्री कुणिका सदानंद, आनंद अ‍ॅग्रोचे उद्धव आहेर, ज्योती भट, शरयू दिघावकर, हिमांशू दिघावकर उपस्थित होते. स्व. डॉ. अस्मिता दिघावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत योगदान देणाºया व समाजातील इतर महिलांना प्रेरणास्रोत असणाºया महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माधव दिघावकर, हेमांगिनी देवरे, सुरेश पवार, शिवाजी अहिरे, अशोक चौधरी, माधुरी सदावर्ते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वैशाली आहेर यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.
या महिलांचा झाला सन्मान
कृषी क्षेत्रात विशेष योगदान देणाºया ज्योती देशमुख, स्रीभ्रूण हत्या अभियान राबविणाºया मीना बाग, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाºया सपना रामटेके, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, नासा स्पेस सेंटरच्या अपूर्वा जाखडी, आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगना अदिती नाडगौडा, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाºया डॉ. जोत्स्ना सोनखासकर, मतिमंद मुलांसाठी योगदान देणाºया विद्या फडके, सामाजिक कार्यात काम करणाºया भाग्यश्री चौधरी, पोलीस प्रशासनातील पल्लवी कदम, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उषा सावंत, आदिवासी भागात काम करणाºया प्राप्ती माने, व्यसनमुक्तीचा प्रसार करणाºया ताराबाई बागुल, उद्योग क्षेत्रात काम करणाºया नीलिमा पाटील या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Web Title:  'Asmita' honors women in duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.