इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:55 AM2018-06-27T01:55:33+5:302018-06-27T01:59:39+5:30

अझहर शेख । नाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायºया बांधण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे. निसर्गरम्य वातावरणात धबधब्याच्या तुषारात चिंब होताना पर्यटकांनी बेभान न होता मनमुराद आनंद लुटण्याची गरज आहे.

The Asoka Falls Footstep near Igatpuri | इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर

इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर

googlenewsNext
ठळक मुद्देअडीचशे मीटरपर्यंत पायऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी; बाळगावे भान

अझहर शेख ।
नाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायºया बांधण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे. निसर्गरम्य वातावरणात धबधब्याच्या तुषारात चिंब होताना पर्यटकांनी बेभान न होता मनमुराद आनंद लुटण्याची गरज आहे.
...म्हणून पडले ‘अशोका’ नाव२००१साली प्रदर्शित झालेल्या अशोका या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान व करिना कपूर यांच्या एका गीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशमधील पंचमढीच्या ‘अप्सरा विहार’ नावाच्या धबधब्याभोवती झाले. हा धबधबा इगतपुरीमधील विहीगावच्या धबधब्याशी साम्य असलेला आहे. अशोकामधील ‘सन सना ना..’ या गीतामधील ‘अप्सरा विहार’ हा धबधबा हुबेहूब विहीगाव धबधब्यासारखा दिसतो. कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्रपाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाईचा हा परिसर एकसारखाच भासतोयमुळे या धबधब्याला ‘अशोका’ असे नाव पडले असावे.

१ या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षितपणे धबधब्यापर्यंत पोहचता यावे, म्हणून तीव्र उताराच्या ठिकाणी पायऱ्यांचे बांधकाम ठाणे जिल्हा नियोजन विकासांतर्गत करण्यात आले आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे सीमेंट-कॉँक्रीटच्या पायºया बांधण्यात आल्या आहेत.

२ या पायºयांभोवती दोन्ही बाजूने भक्कम असे संरक्षित रेलिंग लावण्यात आली आहे. यामुळे धबधब्याची बिकट वाट सुकर व सुरक्षित झाली आहे.

 

Web Title: The Asoka Falls Footstep near Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक