राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत अशोका युनिव्हर्सल प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:07 PM2018-08-19T18:07:42+5:302018-08-19T18:08:11+5:30
नाशिक : भारत विकास परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि़१९) आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत चाँदसी येथील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हिंदी गीत ‘न हो साथ कोई, अकेले बढो तुम’ व संस्कृत गीत ‘जयतू जननी’ या गीतांनी प्रथम क्रमांक मिळविला़ द्वितीय क्रमांक विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, तर तृतीय क्रमांक अशोका ग्लोबल अकॅडमी यांनी प्राप्त केला़ गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित या स्पर्धेत शहरातील सात शाळांनी सहभाग घेऊन प्रत्येकी एक हिंदी व एक संस्कृत गीत सादर केले़

भारत विकास परिषदेने प्रकाशित केलेले ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातील गीते राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत सहभागी शाळांनी सादर केली़ त्यामध्ये राष्ट्र की जय चेतना, सबसे उँची पताका, जननी जन्मभूमी या हिंदी गीतांबरोबरच संस्कृत गीतांचाही समावेश होता़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यश्री जोशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून अविराज तायडे उपस्थित होते़ स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायिका शुभदा तांबट, आशिष रानडे व संस्कृत भाषा तज्ज्ञ अनघा ताटके यांनी काम पाहिले़
या कार्यक्रमास भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष बापू जोशी आणि प्रांत पदाधिकारी द्वारकानाथ तिवारी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी केले़ सूत्रसंचालन हेमंत गोखले यांनी, तर आभार अनिल खांडकेकर यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ विसपुते, प्रकाश देशपांडे, दादा खोडके, माधवराव सवदीकर, सुहास शुक्ल यांनी परिश्रम घेतले़