शहरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा पॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:49+5:302020-12-14T04:29:49+5:30
महावितरणला वसुलीची प्रतीक्षा नाशिक: लॉकडाऊनंतर ग्राहकांना आलेल्या वीज बिलावरून अजूनही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. महावितरण आपल्या निर्णयावर ठाम असून, महावितरणला ...
महावितरणला वसुलीची प्रतीक्षा
नाशिक: लॉकडाऊनंतर ग्राहकांना आलेल्या वीज बिलावरून अजूनही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. महावितरण आपल्या निर्णयावर ठाम असून, महावितरणला आता वीज बिल वसुलीची प्रतीक्षा आहे. काही ग्राहकांनी पैसे भरण्यास सुरुवात केली आहे; मात्र काही ग्राहक अजूनही समाधान झाले नसल्याचे सांगत वीज बिल भरण्यास नकार देत आहे. त्यामुळे कोट्यवधींची थकलेली वीज बिले कशी वसूल करावीत, असा महावितरणला प्रश्न पडला आहे.
द्राक्ष पिकांना कागदाचे आवरण
नाशिक: बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष पिकांची चिंता लागली आहे. ढगाळ वातावरण तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने द्राक्ष पीक संकटात आले आहे. शेतकऱ्यांनी बागेतील द्राक्षांना कागदाचे आवरण लावून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बहरलेल्या बागांवर आता रोग पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.