पाटील ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:41+5:302021-05-26T04:14:41+5:30

सिडको : गेल्या अनेक महिन्यांपासून पाटील नगर ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले असून, मनपाने महिनाभारत ...

Asphalting of Patil to Badde Nagar road stalled | पाटील ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरण रखडले

पाटील ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरण रखडले

Next

सिडको : गेल्या अनेक महिन्यांपासून पाटील नगर ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरणाचे

काम रखडले असून, मनपाने महिनाभारत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

पाटील नगर ते बडदे नगर हा १८ मीटर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा काढली होती. त्यानुसार या रस्त्यासाठी १८ नोव्हेंबर २०१९ ते १७ नोव्हेंबर २०२० असा वर्षभराचा कालावधी रस्ता डांबरीकरण्यासाठी दिला होता. यासाठी सुमारे सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली आहे. सध्या या रस्त्याचे बडदे नगरपासून सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकेच काम शिल्लक आहे. परंतु, जमीन भूसंपादनबाबतचा वाद समोर आल्याने संबंधित लाभार्थी यास महापालिकेकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जागा मालकाशी चर्चा केली व यानंतर हा प्रश्न आयुक्तांनी त्वरित मार्गी लावा यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात पाटील नगर ते बडदे नगर दरम्यानच्या रस्त्यात डांबरीकरणासाठी रुंदीकरणासाठी पाच कोटींहून अधिक रक्कम मंजूर झाली आहे; परंतु यासाठी दिलेला वर्षभराचा कालावधी नोव्हेंबर २०२० मध्ये संपलेला आहे. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याने सिडको परिसरातील नागरिक अंबड-सातपूर औद्योगिक वसाहत इकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. परंतु, रस्त्याचे काम रखडल्याने हा रास्ता त्वरित पूर्ण करावा याबाबत महानगर शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना पत्र दिले असून, येत्या महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

(फोटो:२४ सिडको)

कोट..

मनपाचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना शहर अभियंता या पदाचा प्रभारी चार्ज दिला आहे. हा प्रभारी सहा महिन्यांपर्यंतच देता येत असल्याचे कायद्यात तरतूद करण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही घेगे हे सहा महिन्यांच्या अधिक काळाहून प्रभारी शहर अभियंता म्हणून कामकाज करीत असून, यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे.

-सुधाकर बडगुजर

महानगर प्रमुख, शिवसेना

===Photopath===

240521\381724nsk_32_24052021_13.jpg

===Caption===

पाटील  ते बडदे नगर या रस्त्याचे डांबरीकरण रखडले

Web Title: Asphalting of Patil to Badde Nagar road stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.