पावसात डांबरीकरण; पदपथाने कॉलनी रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:17+5:302021-06-09T04:17:17+5:30
नाशिक : जेलरोड-उपनगर लिंकरोडवरील लेाखंडे मळ्यात डांबरीकरण केलेल्या कॉलनी रस्त्यावर करण्यात येत असलेले पदपथ चर्चेत असतानाच आता भर पावसात ...
नाशिक : जेलरोड-उपनगर लिंकरोडवरील लेाखंडे मळ्यात डांबरीकरण केलेल्या कॉलनी रस्त्यावर करण्यात येत असलेले पदपथ चर्चेत असतानाच आता भर पावसात डांबरीकरण केले जात असल्याने कामाच्या घाईविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
नारायणबापू चौक ते गोदावरी सोसायटीदरम्यान मंगळवारी भर पावसात डांबरीकरणाचे काम सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसातील हे डांबरीकरण पाच महिनेही टिकणार नसल्याचे माहीत असतानाही कामे सुरूच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. डांबरीकरण करण्याचे निकष निश्चित असतानाही असे निकष डावलून जेलरोड-जुना सायखेडा रोडवर चैतन्यनगर येथे रस्त्यावरील खरड न काढता काम सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या ठिकाणी डांबरी रस्त्यावर फूटपाथ बांधण्यात आला असून कॉलनी रस्ता आणि मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या डांबरी रस्त्यावर हा फूटपाथ तयार करण्यात आला आहे.
डांबरी रस्त्यावर मधोमध फूटपाथ उभारल्यास नागरिकांनी जायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कामांमुळे उपनगर रस्त्यावरील लोखंडे मळा येथे कॉलनी रोडवर फूटपाथ बांधल्यामुळे गॅसचा टेम्पो उलटल्याची घटना घडली आहे.
-- कोट--
रस्त्याची कामे केव्हा आणि कशा पध्दतीने करावीत याचे निकष कोर्टाने दिले आहेत. रस्त्याची खरडपट्टी करून डब्ल्यूपीएम करून अंतिम रस्ता करावा असा निकष असताना तो पाळला जात नाही. पावसात रस्ता केला जात असल्यामुळे नागरिकांच्याच पैशाचा अपव्यय होणार आहे.
-शैलेश ढगे, माजी नगरसेवक